Newsworldmarathi Pune : तनिषा उर्फ ईश्वरी सुशांत भिसे यांचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जुळ्या बाळांवर योग्य ते वैद्यकीय उपचार करण्यासह माणुसकीचा हात दिलेल्या वाकड येथील सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा महाराष्ट्र विधानमंडळातील स्वीय सहाय्यक परिवाराच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
गर्भवती तनिषा भिसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्या दोन जुळ्या बालिकांसाठी सूर्या हॉस्पिटलने केवळ वैद्यकीय उपचारच नाही, तर माणुसकीचा हात दिला. त्यांचे संगोपन, काळजी आणि भिसे कुटुंबाला दिलेला मानसिक आधार यातून सूर्या हॉस्पिटल व तेथील स्टाफने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.
या कृतज्ञतेच्या भावनेतून महाराष्ट्र विधानमंडळातील स्वीय सहाय्यक परिवाराच्या वतीने सूर्या हॉस्पिटलला विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. सचिन शहा आणि डॉ. दिनकर पासलकर यांनी हॉस्पिटलच्या वतीने, तर स्वीय सहाय्यकांच्या वतीने बाळा शुक्ला, आनंद ठोकळ आणि अजित गरुड यांनी आपल्या भावना निवेदनांमधून मांडल्या. राष्ट्रीय कला अकादमी (न्यास), पुणे यांनी रांगोळीच्या माध्यमातून सद्भावना व्यक्त केली.
स्वीय सहायकांच्या वतीने बाळा शुक्ला, एकनाथ बाजारे, मयुर तातुसकर, हर्षद धर्माधिकारी, आनंद ठोकळ, अजित गरुड, शहाजी पवार, किशोर जुमडे, रवींद्र कडू आणि संतोष ढोरे आणि सचिन भामे हे उपस्थित होते.


Recent Comments