Newsworldmarathi Pune : पंढरीची वारी आता थेट साता समुद्रापार जाणार आहे. मूळचे अहिल्यानगरचे पण सध्या लंडन स्थायिक असलेले विठ्ठलभक्त अनिल खेडकर आणि त्यांची दिंडी पंढरपूर येथून थेट लंडनला श्री विठ्ठलाच्या पादुका घेऊन जात आहेत. १४ एप्रिल ते २१ जून या कालावधीत तब्बल २२ देश आणि अठरा हजार किलोमीटरचा प्रवास या अनोख्या दिंडीतून करणार आहेत. या विठ्ठलाच्या पादुकेचे पूजन विठ्ठल मंदिरात करण्यात आले असून, या अनोख्या दिंडीने लंडनकडे प्रस्थान केले आहे.
पंढरी वारीची ख्याती जगभरात पसरली आहे. अनेक अभ्यासक भक्तमंडळी या वारीचा अनुभव घेताना दिसून येतात. मूळ अहिल्यानगरचे पण सध्या लंडन स्थायिक असणाऱ्या खेडकर या भाविकाने विठ्ठलाच्या पादुकांच्या दिंडीचे आयोजन केले आहे. अनिल एकनाथ खेडकर हे भारतात होते. त्यावेळेस त्यांनी आळंदी ते पंढरपूर अशी वारीदेखील केलेली आहे. त्यावरून लंडन येथे विठ्ठल मंदिर उभे करावे आणि त्या पादुका वारकरी संप्रदायाप्रमाणे दिंडीच्या माध्यमातून आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याचे खेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवले.
पंढरपूर येथून लंडन असा प्रवास करताना विविध देश, त्यांच्या विविध परवानगी, पास इत्यादी कायदेशीर मान्यता सहा महिन्यांपासून सुरू होती. यासाठी २२ देशांच्या चारचाकी गाडी प्रवासाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. पुढे त्यांनी १४ एप्रिल ते २१ जून हा कालावधी निश्चित केला. रोज किती किलोमीटर प्रवास, मुक्काम यांचे नियोजन केले.


Recent Comments