Newsworldmarathi Mumbai: “मी पोलिसांच्या हाती लागणार नाही” म्हणणारा, अखेर शरण येणार! निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेने खळबळजनक दावा केला आहे.
20 वर्षे सायबर पोलिस दलात काम केलेल्या, आणि सध्या निलंबित असलेल्या रणजीत कासलेने पोलिसांपासून लपून राहण्याचा दावा करत, दररोज दोन गाड्या बदलून लोकेशन बदलत असल्याचं सांगितलं होतं. “पोलिसांनी कितीही प्रयत्न केले, तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही,” असा टोकाचा इशारा देणाऱ्या कासलेने आता शरण येण्याची तयारी दाखवली आहे.
कासलेने यापूर्वी बीड पोलीस आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याला ‘वाल्मिक कराडसारखं एन्काऊंटर’ करण्याची ऑफर मिळाल्याचा दावाही केला होता. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. बीड पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता, पण तो अचानक गायब झाला होता.
आता कासलेने स्वतःहून शरण येण्याची घोषणा करत, पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. त्याच्या आरोपांची आणि शरणागतीची दखल घेतली जात असून, पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
रणजीत कासलेचा नवा व्हिडीओ: “पळून उपयोग नाही… आता लढणारच!”
बीड पोलिसांकडून शोध घेत असलेला आणि सायबर विभागातील निलंबित अधिकारी रणजीत कासले याने शेअर केलेल्या नव्या व्हिडीओने खळबळ उडवली आहे. “मी कालपासून अनेकांच्या प्रतिक्रिया वाचल्या, काहींशी संवादही साधला. वकिलांशी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर मला जाणवलं – आता पळून काही होणार नाही. मी आतापर्यंत प्रत्येक संकटाचा सामना केला आहे, आणि याही वेळेस करणार आहे,” असं कासले म्हणतो.
व्हिडीओमध्ये कासलेने स्पष्टपणे जाहीर केलं आहे की तो बीड पोलिसांसमोर शरण जाणार आहे. “सिस्टीमच्या विरोधात जास्त काळ लढता येत नाही. माझा बळी जाणार हे आता मला स्पष्ट झालं आहे. पण मी जे आरोप केले, ते सिद्ध करून दाखवेन,” असं ठाम वक्तव्य त्याने केलं.
प्रमुख मुद्दे:
– “मी पोलीस खात्याचं मीठ खाल्लं आहे, माझी लढाई आता कायदेशीर मार्गाने लढेन.”
– “मी लवकरच दोन्ही मोबाईल सुरु करणार आहे. कॉल नको – मेसेज करा, मी वाचतो आणि रिप्लाय देतो.”
– “ज्यांच्यावर आरोप केले, ते आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. वॉशिंग मशीनमधून स्वच्छ बाहेर येणार आहेत.”
– “बीड पोलिसांनी मला पकडलं तरी हरकत नाही. मी पोलिसांसमोर हजर होणारच.”
या व्हिडीओनंतर रणजीत कासले पोलिसांच्या ताब्यात आल्यावर त्याच्या चौकशीतून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. पुढील काही तास या प्रकरणात निर्णायक ठरणार आहेत.
कासलेचे गंभीर आरोप:
10, 20, 50 कोटींच्या ऑफर देऊन एन्काऊंटरसाठी दबाव
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत घेतले जातात निर्णय
विश्वासू टीम तयार करून ‘बोगस एन्काऊंटर’ घडवले जातात
चौकशी झाली तरी “आमचं सरकार आहे” असं म्हणत पोलीस अधिकाऱ्यांना आश्वासन
रणजीत कासले सध्या पोलीसांच्या ताब्यात नाही, मात्र त्याने स्पष्ट केले आहे की, “लवकरच दोन्ही मोबाईल सुरु करेन, कॉल करू नका, मेसेज करा. मी प्रतिसाद देईन.” या प्रकरणात आता पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.


Recent Comments