Homeपुणेतनाएराचे 'समर सॉन्ग्स' कलेक्शन

तनाएराचे ‘समर सॉन्ग्स’ कलेक्शन

Newsworldmarathi Business : मोठे दिवस, गरम हवा अशा वातावरणात तुम्हाला तजेला आणि आनंद देईल असे नवे ‘समर सॉन्ग्स’ कलेक्शन तनाएराने आणले आहे. सूर्यप्रकाशाने लख्ख उजळलेले दिवस, हलक्या हवेच्या झुळुका आणि निसर्गातील ताल यांचे सार ‘समर सॉन्ग्स’ मध्ये सामावले आहे. शानदार आणि तरीही आरामदायी कपडे ज्यांना आवडतात अशा महिलांसाठी डिझाईन करण्यात आलेल्या या कलेक्शनमध्ये आरामदायी कॉटन, नाजूक सिल्क, सिल्क कॉटन, हवेशीर ऑर्गन्झा आणि कोटा असे विविध प्रकार आहेत, भारतातील सर्वोत्तम टेक्स्टाईल्सची, प्रत्येक काळात पसंद केली जाणारी कारीगरी यामध्ये पाहायला मिळेल.

ग्रीष्माच्या कवितेने प्रेरित होऊन तयार करण्यात आलेले हे कलेक्शन ऋतूच्या बदलत्या रंगांचा आनंद साजरा करते. उन्हामुळे शुष्क झाल्यामुळे सोनेरी छटा आलेल्या पानांपासून समुद्रकिनारी चमकणाऱ्या कोरल गार्डन्सपर्यंत या कलेक्शनमधील प्रत्येक पीस ऋतूच्या तजेलदार, चमकदार, मनमोहक पॅलेट्स दर्शवतो. मऊशार पेस्टल्स, हिरवाई आणि चमकदार कोरल्स या कलेक्शनमधील नाजूक प्रिंट्स, हाताने रंगवलेले डिटेल्स आणि नव्या-जुन्या प्रत्येक काळात पसंद केल्या जाणाऱ्या विणकाम परंपरांमधून जिवंत साकार झाल्या आहेत. दररोजच्या कपड्यांपासून विलक्षण सुंदर आणि शानदार कपड्यांपर्यंतचा बदल तुमच्या वॉर्डरोबमध्ये अगदी सहजपणे घडवून आणण्याचे काम हे कलेक्शन सराईतपणे करते.

हवेशीर, आरामदायी कापडापासून तयार करण्यात आलेल्या, नव्या-जुन्या सर्व काळात पसंद केल्या जातील अशा, आधुनिक गरजांना अनुरूप बहुउपयोगी, विचारपूर्वक डिझाईन करण्यात आलेल्या, साड्या आणि रेडी-टू-वेयर कपडे या कलेक्शनचा मुख्य भाग आहे. साड्यांच्या रेन्जमध्ये राजस्थानच्या संगानेरी ब्लॉक प्रिंट्स, बंगालच्या मलमल आणि जामदानी या विणकामांनी सजवलेल्या प्युअर कॉटन साड्या आहेत, दररोज वापरता येतील आणि तरीही अतिशय सुंदर व शानदार दिसतील अशा या साड्या वापरायला अगदी सहज आहेत. कोटा साड्यांची तजेलदार शान, हाताने रंगवलेल्या मुर्शिदाबाद सिल्कस् आणि सिल्क कॉटन व ऑर्गन्झा साड्या, त्यावरील प्रिंट्स, एम्ब्रॉयडरी, हाताने केलेल्या रंगकामाची शान यामुळे या साड्या ऑफिसमध्ये घालता येतील आणि कॅज्युअल समारंभांमध्ये देखील तितक्याच उठून दिसतील.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments