Homeपुणेदेशाच्या स्वातंत्र्याच्या दिपस्तंभाच्या व योगदान देणाऱ्या कुटुंबाच्या’ बदनामीचे प्रयत्न : गोपाळ तिवारी

देशाच्या स्वातंत्र्याच्या दिपस्तंभाच्या व योगदान देणाऱ्या कुटुंबाच्या’ बदनामीचे प्रयत्न : गोपाळ तिवारी

Newsworldmarathi Pune :
२०२४ च्या लोकसभा निवडणूकीत बॅंक-खाती गोठवुन देखील, जनतेने काँग्रेस पक्षास दुप्पट जागा देऊन मजबूत विरोधी पक्ष केले व देशात काँग्रेस पक्ष विरोघी पक्षाची भुमिका सक्षमतेने बजावत असतांना.. मोदी सरकार ११ वर्षा नंतर देखील स्वातंत्र्य संग्रामात दिपस्तंभाची भुमिका निभावणाऱ्या ‘नॅशनल हेरॅाल्ड वृत्तसंस्थेची व ती स्थापन केलेल्या नेहरू – गांधी कुटुंबाची तथ्यहीन बदनामी करण्याचे कुटील राजकारण’ करत आहेत व पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्रामा विषयी, स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यां विषयी असूयाच स्पष्ट करत असल्याची घणाघाती टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

पुणे शहर जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या काँग्रेसच्या निदर्शनात ते बोलत होते. नॅशनल हेरॅाल्ड चा कथित घोटाळा व गांधी कुटुंबीयावरील ईडी च्या आरोपपत्रा विरोधात पुणे शहरासह देशभरात आज आंदोलने करण्यात आली.

भाषणात ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारच्या ‘भ्रष्टाचार विरोधी भुमिकेवर व हेतू’वर आता कोणाचाच विश्वास राहिलेला नसुन केवळ स्वायत्त सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून व दबाव आणून मोदी सरकार विरोधी पक्षास बदनाम करून नेस्तनाबूत करण्यात धन्यता मानत आहे.

ते करण्या ऐवजी मोदी सरकारने ‘पंतप्रधान-निधी’ची पारदर्शकता न दडवता त्याचे विवरण जाहीर करावे व देशाप्रती ऊत्तर दायीत्वाचा राजधर्म निभवावा.. असे आवाहन देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.. या प्रसंगी मा अरविंद शिंदे, अविनाश बागवे, संजय बालगुडे, अभय छाजेड, रमेश बागवे इ भाषणे झाली. अजीत दरेकर यांनी संचालन केले व प्राची दुधाणे यांनी आभार व्यक्त केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments