Homeबातम्याबीड पुन्हा हादरलं...! अल्पवयीन मुलाला सिमेंटच्या नाल्यावर आपटलं; मुलाचा तडफडून मृत्य, नेमकं...

बीड पुन्हा हादरलं…! अल्पवयीन मुलाला सिमेंटच्या नाल्यावर आपटलं; मुलाचा तडफडून मृत्य, नेमकं काय घडलं?

Newsworldmarathi Beed: बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे. चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील केज शहरात घडली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेतील आरोपीही अल्पवयीन आहे. रेहान कुरेशी असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अल्पवयीन आरोपीचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. रेहान कुरेशी नावाच्या अल्पवयीन मुलाचं दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाशी वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि आरोपीने रागाच्या भरात रेहानला उचलून थेट सिमेंटच्या नाल्यावर आपटलं. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रेहानचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

7 वर्षीय तरुणाची हत्या, मृतदेहाचे तुकडे कचऱ्यात फेकले

नवीबस्ती नेहरूनगर परिसरातील दुकानात हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून काही अवशेष दुकानात गाडून तर काही अवशेष कचऱ्यात फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी अटक केली आहे. शोएब शेख (वय -१७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गुलाम रब्बानी शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments