Homeपुणेगौरव संविधानाचा' कार्यक्रमातून उलगडला महामानवाचा संघर्षमय प्रवास

गौरव संविधानाचा’ कार्यक्रमातून उलगडला महामानवाचा संघर्षमय प्रवास

Newsworldmarathi Pune: भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) तर्फे जागर संविधानाचा या उपक्रमाअंतर्गत आज ‘गौरव संविधानाचा’ या सांगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडला, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला ‘गौरव संविधानाचा’ मधून उजाळा देण्यात आला. 

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे  आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेश संघटक  सचिव परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर  यांच्या पुढाकारातून  यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, प्रियदर्शी सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत आज  राजर्षी शाहू महाराज चौक बोपोडीमध्ये दिमाखदार सांगीतिक कार्यक्रम  पार पडला. या कार्यक्रमाला पुण्यातील आंबेडकर प्रेमी जनतेची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या एकाहून एक सुमधूर व दर्जेदार गीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त  दाद दिली.

उदय साटम निर्मित – दिग्दर्शित ‘गौरव संविधानाचा’ या कार्यक्रमाची सुरुवात ‘नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा’ या गीताने करण्यात आली, त्यांनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्यावरील  ‘दोनच राजे इथे ….’ , महात्मा फुले यांच्या वरील ‘धन्य धन्य ते महात्मा फूले’, ‘बुद्ध -कबीर – भीमराव – फुले’ यासह डॉ. आंबेडकर यांचा संघर्षमय जीवणप्रवास विविध गीते आणि संगीत नाटिका मधून उलगाडण्यात आला. या कार्यक्रमाचे लेखन आणि निवेदन प्रतिक जाधव यांनी केले होते तर गायक दर्शन साटम, गायिका   उमा गावड, स्वाती हरवंदे यांनी गाण्यांचे सादरीकरण केले तर संगीत संयोजन शरद वाणी, अभिजीत मोरे यांनी केले होते.  यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते शैलेन्द्र चव्हाण, सांसकर्तीक महोत्सव समितीचे सचिव दीपक म्हस्के यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि रिपब्लिकन पक्षाचे शिवाजीनगर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments