Newsworldmarathi Pune : “आवाज “ही आपल्याला मिळालेली ईश्वरी देणगी आहे. तिची जपणूक करणे, काळजी घेणे हे खूप आवश्यक आहे. आपल्या स्वरयंत्र मध्ये जर काही दोष निर्माण झाले आणि आवाज खराब झाला तर हे बरे होणे अतिशय कठीण असून यासाठी आहार, विहार ,विविध सवयी, दिनक्रम या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.या दृष्टीने सुप्रसिद्ध स्वरतज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी लिहिलेल्या *व्हॉइस केअर* या पुस्तकाचा गायक ,निवेदक, कीर्तनकार, शिक्षक , व्याख्याते विशेषता आवाजाशी संबंधित मंडळींना खूप मोलाचे मार्गदर्शन होत आहे.
यामधील संगीत विषयक माहिती, शास्त्रीय वैज्ञानिक माहिती आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती या सर्वांचा उत्कृष्ट संगम ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे या पुस्तकाचा प संदर्भ ग्रंथ म्हणून नक्की वापर होऊ शकेल असा मला विश्वास आहे. स्वरतज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी गायकांसाठी केलेले या संशोधनाबद्दल मी त्यांच्या प्रति कृतज्ञ आहे असे प्रतिपादन जगप्रसिद्ध गायक हरिहरनजी यांनी व्यक्त केले.
गायकांसाठी स्वरतज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी लिहिलेल्या व्हॉइस केअर फॉर सिंगर्स अँड प्रोफेशनलस या पुस्तकाची दुसरी आवृत्ती च्या निमित्ताने स्वर साधना या विषयावर बोलताना पं. हरिहरन यांनी हे मत व्यक्त केलं.
याप्रसंगी जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक, स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी स्वरसाधना, संगीत साधना या गोष्टी केवळ प्रसिद्धी, पैसा मिळवण्यासाठी नसून ती तपश्चर्या आहे, हा विचार गायक आणि विशेषता या क्षेत्रात येणारे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे असे मत व्यक्त केले.


Recent Comments