Homeपुणेहॉटेलच्या बाहेर बसलेल्या कौस्तुभ यांना गोळी लागल्यावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला... अर्धा...

हॉटेलच्या बाहेर बसलेल्या कौस्तुभ यांना गोळी लागल्यावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला… अर्धा तास मिळाली नाही मदत..

Newsworldmarathi Pune : कौस्तुभ गनबोटे हे शनिवारी पुण्यातून विमानाने जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मित्र संतोष जगदाळे हे देखील होते. काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरण घाटी भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.

गोळीबार सुरु होता संतोष जगदाळे कौस्तुभ गनबोटे व इतर पर्यटक हॉटेलच्या बाहेर बसले होते. गोळीबारचा आवाज झाल्याने आरडा ओरड सुरु झाली. पर्यटक धावपळ करू लागले त्यामुळे दहशत वाद्यांनी लांबूनच पर्यटकांच्या दिशेने गोळीबार केला.

Oplus_131072

त्यात संतोष जगदाळे यांच्या खांद्याजवळ तर कौस्तुभगनबोटे यांच्या कमरेच्या खाली गोळी लागुन गेली. कौस्तुभ गनबोटे यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. शुगरचा त्रास असल्याने रक्त थांबत नव्हते. तर जवळच असणारे संतोष जगदाळे यांना देखील मोठ्या प्रमाणात जखम झाल्याने कौस्तुभ गनबोटे घाबरून गेले होते. त्यांच्या पत्नी देखील जवळच होत्या गोळी लागल्यानंतर जवळपास अर्धा तास त्यांना मदत मिळाली नाही. तर अॅम्बुलन्स देखील आली नाही.

गोळीबार झाल्यानंतर सुरुवातीला धावपळ सुरू होती त्यामुळे कौस्तुभ गनबोटे यांचा त्यांच्या पत्नीने शोध घेतला त्यानंतर ते जखमी अवस्थेत मिळून आले. त्यांना जखमी अवस्थेत बघून त्यांच्या पत्नीला देखील मोठा धक्का बसल्याने त्यांच्यावर देखील उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून मिळाली. तसेच कौस्तुभ गनबोटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळतच त्यांचा मुलगा कुणाल हा तात्काळ त्यांच्याकडे विमानाने रवाना झाला.

कौस्तुभ गनबोटे यांचा मागील तीस वर्षांपासून गनबोटे फरसाण हाऊस या नावाने व्यवसाय होता. अगदी छोट्याश्या व्यवसायातून आज त्यांनी गनबोटे फरसाण हाऊस हा व्यवसाय नावारूपाला आणला होता. कौस्तुभ गनबोटे यांना एक मुलगा असून त्याचा विवाह दोन वर्षांपूर्वीच झाला होता. अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अशा अकाली जाण्याने मित्रपरिवार व कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांचा मृतदेह आज विमानाने पुण्याला आणणार असल्याची माहिती मिळत आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments