Newsworldmarathi pune: आज भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाकडे एक महत्त्वाचा अर्ज दाखल केला होता.

या अर्जात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र सादर करण्याची मागणी करण्यात आली होती. या पत्रात “भीमा कोरेगाव येथील हिंसाचार पूर्वनियोजित होता,” असे नमूद करण्यात आले होते. या संबंधित पत्राची बातमी तत्कालीन सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.
शरद पवार यांच्याकडे जर हे पत्र अस्तित्वात असेल, तर ते आयोगासमोर सादर व्हावे, अशी आमची भूमिका असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आयोगाने आमची बाजू विचारात घेतली असून या संदर्भात लवकरच निर्णय आयोग घेणार आहे. लवकरच या संदर्भातील पुढील सुनावणी होणार आहे.


Recent Comments