Newsworldmarathi pune: जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पुण्याचे उद्योजक कौस्तुभ गणबोटे दुर्दैवी मृत्युमुखी पडले. त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून त्यांच्या पार्थिवाचे राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी अंत्यदर्शन घेतले. गणबोटे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत गणबोटे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी शरद पवार यांच्या समोर कौस्तुभ यांची पत्नी यांनी घडलेला सर्व थरारक अनुभव सांगितला.

पत्नी संगीता कौस्तुभ म्हणाल्या, आम्हाला निर्बल लोकांना बघून ते अतिरेकी आले. आम्ही महिलांनी कपाळाच्या टिकल्या काढून टाकल्या मोठं मोठ्यांनी आजन वाचली तरी आमच्या माणसांना त्या अतिरेक्यानी मारले. त्यावेळी तिथे आमच्या मदतीला कोणीच नव्हते. आम्ही महिला आमचा जीव वाचावात तिथून पळत निघालो. हा थरारक अनुभक कधीही विसरता येणार नाही…
आज कौस्तुभ गणबोटे यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या अगोदर त्यांचे पार्थिव त्यांच्या कोंढव्यातील साईनगर च्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अंत्यदर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.


Recent Comments