Newsworldmarathi Shirur : शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील कौल वस्तीत घराच्या पढवीत झोपलेल्या वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला चढवित शिकार समजून ७०० फूट फरफटत नेले. यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. उन्ह्यळ्यात घराबाहेर झोपलेल्या वृद्धेचा साखर झोपेतच दुर्देवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मीबाई बबन भोईटे (वय ८२), असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवार (दि.२५) पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली.
इनामगाव येथे पहाटेच्या सुमारास सुरुवातीला बिबट्याने घरासमोर असलेल्या कुत्र्यावर झडप घातली. मात्र, सावध असलेला कुत्रा हा बिबट्याच्या हल्ल्यातून निसटून पळून गेला. बिबट्याचे लक्ष लक्ष्मीबाई भोईटे यांच्याकडे गेले. त्याने त्यांना घराच्या मागील डांबरी रस्त्यापलीकडील ७०० फूट अंतरावर उसाच्या शेतात ओढून नेले. घराच्या पढवीत झोपलेल्या लक्ष्मीबाई या दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. सकाळी ही माहिती ग्रामस्थ विक्रमसिंग नलगे यांनी वनविभागाला दिली. शिरूरचे वनपाल व पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
वनविभाग ॲक्शन मोडवर
वनविभागाच्या पथकाने पंचनामा करून मृतदेह न्हावरे येथे ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवले. घटनेनंतर वन अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थ व सरपंच-उपसरपंचांसमवेत चर्चा केली. दरम्यान, हल्ला करणाऱ्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ड्रोन, ९ ट्रॅप कॅमेरे, ५ पिंजरे, ४ अनायडर आणि २ फिरते कॅमेरे बसवले आहेत. परिसरात रात्रीची गस्त वाढवली आहे
Recent Comments