Newsworldmarathi Mumbai :नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गुरुनाथ चिंचकर असं बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. चिंचकर यांनी ९ एमएमच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
चिंचकर यांची दोन्ही मुले अमली पदार्थ तस्करीत सहभागी होती. यामुळे चिंचकर यांना पोलिसांकडून सतत चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. चिंचकर यांना हा त्रास सहन झाला नाही आणि त्यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिंचकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली असून, त्यात त्यांनी याबाबत स्पष्ट उल्लेख केला आहे.

गुरुनाथ चिंचकर हे एनआरआय पोलीस स्टेशनच्या पाठीमागील गुरुकिरण सोससायटीत राहण्यास होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तळमजल्यावर आले होते. त्यानंतर त्यांनी कार्यालयात स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत मोठं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं होतं. मुंबईच्या अमली पदार्थ पथकाकडून नवी मुंबईत मोठी कारवाई करत 200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणात मयत गुरू चिचकरच्या दोन्ही मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका मुलाला अटक केली होती, तर दुसरा मुलगा फरार झाला होता.
अटकेतील मुलगा सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. याच ड्रग्ज प्रकरणात गुरू चिचकर यांना NRI पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. याच चौकशीच्या विवंचनेतून चिचकर यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत.
Recent Comments