Homeपुणेजैन सोशल ग्रुपच्या वतीने “उत्तुंग भरारी” सन्मान सोहळा

जैन सोशल ग्रुपच्या वतीने “उत्तुंग भरारी” सन्मान सोहळा

Newsworldmarathi Pune: समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान म्हणजे समाजाला मिळणारी प्रेरणा. जैन सोशल ग्रुप पुणे पश्चिम यांच्या वतीने आयोजित “उत्तुंग भरारी सन्मान सोहळा” नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यात आनंद भंडारी (जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालक भुमी), शेखर मुंदडा (अध्यक्ष, महाराष्ट्र गो सेवा आयोग), विजय बाविस्कर (ग्रुप एडिटर, लोकमत महाराष्ट्र-गोवा), अभिजीत डुंगरवाल (एडिटर, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क व महाराष्ट्र जैन वार्ता), संदीप गादिया (सायबर क्राईम इन्वेस्टिगेशन एक्सपर्ट), प्रकाश धोका (उद्योगपती व समाजसेवक) आणि नंदिनी वाग्यांनी (सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे शहर) यांचा गौरव करण्यात आला.

Oplus_131072

कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय भंडारी (अध्यक्ष, जीतो अपेक्स) होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती,कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांची विशेष उपस्थिती होती.

२५ एप्रिल २०२५ रोजी, शुक्रवार, संध्याकाळी ६.३० वाजता, शराव लॉन्स, तुळजा भवानी मंदिर समोर, एम.आय.टी. कॉलेज रोड, कोथरूड, पुणे येथे हा भव्य सोहळा पार पडला.

कार्यक्रमाचे संयोजन रामलाल शिंगवी (संस्थापक अध्यक्ष, जैन सोशल ग्रुप पुणे पश्चिम) आणि प्रकाश भंडारी (अध्यक्ष) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पंचवटकर यांनी केले, तर अनिल लुंकड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी मंचावर दिलीप मेहता, डॉ. सुमतीलाल लोढा, सचिन लोढा, प्रदीप गांधी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

“समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा व्यक्तींनी केलेल्या अथक परिश्रमांना व त्यांच्या सेवेला आदराने मान्यता देणं ही आपल्या संस्कृतीची परंपरा आहे. ‘उत्तुंग भरारी’ सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही या मान्यवरांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न केला आहे.”

– विजय भंडारी अध्यक्ष, जीतो अपेक्स

“समाजासाठी काहीतरी सकारात्मक करणे हीच खरी उन्नती आहे. आजच्या या सन्मान सोहळ्यात सहभागी होताना विशेष आनंद वाटतो आहे. अशा कार्यक्रमांमुळे प्रेरणा मिळते आणि नव्या पिढीसमोर आदर्श व्यक्तिमत्त्वे उभी राहतात. समाज उन्नतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.”

– कृष्णकुमार गोयल, उद्योगपती,कोहिनूर ग्रुपचे प्रमुख

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments