Newsworldmarathi Pune: पुणे-जोधपूर-पुणे दैनंदिन रेल्वेसेवेला रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. ही घोषणा केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. रेल्वे क्रमांक २०४९५ व २०४९६ या दोन रेल्वेगाड्या नियमीतपणे हडपसरवरून धावणार आहेत. त्यामुळे राजस्थानी समाज संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. लवकरच रेल्वे प्रवासाचे बुकिंगही सुरु करण्यात येणार आहे.
जिल्हयातील संपूर्ण राजस्थानी समाजातर्फे मागील अनेक वर्षापासुन ही सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. राजस्थानमधील खासदार पी. पी. चौधरी, गजेंद्रसिंग शेखावत, पुण्याचे खासदार आणि केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह इतर मान्यवरांनी ही सेवा सुरु करण्यासंबंधी राजस्थानी समाजाच्या वतीने रेल्वे मंत्र्यांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता, अशी माहिती राजस्थानी समाज संघाचे अध्यक्ष मगराज राठी यांनी दिली.

रेल्वेसेवेची मागणी पूर्ण झाल्याने संपुर्ण राजस्थानी समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून पुणे-जोधपूरदरम्यान रोज साधारणतः ६० ते ७० बसेस सुरु आहेत. रोज अपघात होत असून निष्पाप जिवांना आपले प्राण गमवावे लागत होते. संघटनेने केलेल्या मागणीनुसार साप्ताहिक रेल्वे सुरु झाली परंतु सर्वांची मागणी ही नियमित रेल्वेची होती ती आज पुर्ण झालेली आहे त्याबद्दल रेल्वेखाते आणि अश्विनी वैष्णव यांचे आभार व्यक्त करत ही सेवा लवकरात लवकर सुरु व्हावी असेही राठी यांनी सांगितले.


Recent Comments