Newsworldmarathi Sangali : काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या कन्येचे निधन झाले आहे. भारतीताई महेंद्र लाड यांच्या अकाली मृत्यूने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी याबाबत माहिती दिली.
विश्वजीत कदम यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ताईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘माझी मोठी बहीण आदरणीय भारतीताई महेंद्र लाड यांचं निधन झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद व वेदनादायी आहे. आजवरच्या वाटचालीत त्यांचं पाठबळ, प्रेम आणि स्नेह नेहमीच ऊर्जादायी राहिले. त्यांच्या निधनाने कदम व लाड परिवाराची कधीच न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आदरणीय ताईला भावपूर्ण श्रद्धांजली.’
पतंगराव कदम यांनी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली होती. लाडकी कन्या ‘भारती’ यांच्या नावावरुन या विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले होते. भारती लाड या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांच्या पत्नी होत. भारती यांच्या पश्चात पती महेंद्र लाड, भाऊ विश्वजीत कदम, बहीण अस्मिता जगताप असा परिवार आहे. त्यांचे पती महेंद्र लाड हे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.


Recent Comments