पुण्यात सध्या भटक्या कुत्र्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिका परिसरात नरेंद्र शेर बहादुर बिस्ता या अवघ्या 7 वर्षाच्या मुलावर एका भटक्या श्वानाने तीव्र हल्ला केला, ज्यामुळे मुलाचा डावा गाल पूर्णपणे वेगळा झाला. रात्री १०:३० च्या दरम्यान नरेंद्रच्या नातेवाईकांचा मला फोन आला आणि झालेल्या घटनेची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता झालेल्या घटनेची माहिती मा. कार्यक्षम आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून सांगितली.
त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केल्याने नातेवाईकांनी मुलाला रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारांची गरज पाहता त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागणार होते.आमचे सहकारी श्री. रविंद्रजी साळेगावकर यांच्या सहकार्याने आमदार साहेबांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधला व तात्काळ जलदगती उपचारांची व्यवस्था केली.
उत्तरदायी अधिकाऱ्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून मुलाला तात्काळ दाखल करून घेतले, आवश्यक रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन्स दिली आणि दुसऱ्या दिवशी तातडीने शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
उपचार पूर्ण झाल्यावर आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मुलाला भेट दिली आणि रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.
नरेंद्रने इतक्या लहान वयात दाखवलेलं धैर्य आणि जिद्द पाहून विशेष कौतुक वाटलं. खरंच, माणसाच्या जिद्दीचे दर्शन कुठे आणि कसे घडेल, सांगता येत नाही. नरेंद्रच्या रूपात ती जिद्द प्रत्यक्ष अनुभवली.


Recent Comments