Newsworldmarathi Ahilyanagar : अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप (वय ६७) यांचे आज २ मे रोजी पहाटे निधन अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना पाच एप्रिल रोजी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल एक महिना अरुण काका जगताप यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
नगर शहरात आणि परिसरात लोकप्रिय असलेले अरुणकाका यांचे समाजकारण व राजकारणातील योगदान लक्षणीय होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण अहिल्यानगरसह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होत. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे ते व्याही होते.
अरूण जगताप यांनी अनेक पदे भुषवली
अरूण जगताप यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भुषविले. अहिल्यानगर पालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष राहिले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यकारी सदस्य आहेत. गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. आमदार अरुण जगताप हे सलग दोनवेळा अहिल्यानगर जिल्ह्यातून विधानपरिषदेवर ते निवडून गेले होते.
अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली होती भेट
५ एप्रिल रोजी त्यांना अत्यावस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींनी रुग्णालयात जाऊन माजी आमदार जगताप यांच्या तब्ब्येतीबाबत आमदार संग्राम जगताप यांच्याकडून माहिती घेतली होती. उपचारादरम्यान माजी आमदार जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


Recent Comments