Newsworldmarathi Baramati: श्री छत्रपती सहकारी कारखाना भवानीनगर या ठिकाणी प्रशांत दराडे यांना पृथ्वीराज जाचक यांनी उमेदवारी देऊन त्यांच्यावरती विश्वास दाखवला आहे. शेतकरी कुटुंबातील प्रशांत दराडे यांना ही संधी दिल्याने जाचक यांचे कौतुक करण्यात येत आहे.
श्री छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यात समन्वय साधत ‘श्री जय भवानी माता’ सर्वपक्षीय पॅनल जाहीर करण्यात आला. लासुर्णे, सणसर, उद्धट, अंथुर्णे, सोनगाव व गुणवडी या गटांमधून प्रत्येकी दोन ते तीन उमेदवार तर ‘ब’ वर्ग, अनुसूचित जाती-जमाती, महिला राखीव, ओबीसी व भटक्या-विमुक्त प्रवर्गातून प्रत्येकी एक उमेदवार निवडण्यात आले. गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर जागावाटप निश्चित करण्यात आले.


Recent Comments