Homeपुणेआयसीएसई बोर्डाच्या निकालामध्ये अविषा जॉन पुण्यामध्ये द्वितीय

आयसीएसई बोर्डाच्या निकालामध्ये अविषा जॉन पुण्यामध्ये द्वितीय

Newsworldmarathi pune : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) यांच्यातर्फे घेतलेल्या आयसीएसईच्या (दहावी) परीक्षेत अविषा जॉन हिला 99.4% गुण मिळवून पुणे शहरात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अविषा जॉन हि बाकलीवाल ट्युटोरियल्सच्या 3 वर्षीय फाउंडेशन आणि स्पेशल कॉम्प्रिहेन्सिव कोर्सची विद्यार्थिनी आहे.

अविषा तिच्या सातत्यपूर्ण अभ्यासू वृत्ती, शैक्षणिक गुणवत्ता आणि शांत स्वभावासाठी ओळखली जाते. बाकलीवाल ट्युटोरियल्समध्ये तिने घालवलेल्या तीन वर्षांत ती सतत टॉप परफॉर्मर राहिली आहे. तिचे उत्तम गुण हे तिच्या मेहनतीचे आणि संस्थेने दिलेल्या कठोर मार्गदर्शनाचे फलित आहेत. पुढील वाटचालीत अविषा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याचा मानस बाळगते आणि आपल्या उज्वल भविष्याकडे ठामपणे वाटचाल करत आहे.

सीआयएससीईच्या भारतासह परदेशातील दोन हजार ८०३ शाळांमधील दोन लाख ५२ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी यंदा आयसीएसईची परीक्षा दिली. त्यातील दोन लाख ५० हजार २४९ म्हणजेच ९९.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments