Homeमुंबईलाकडी दांडक्याने मारहाण करत जावयाने केला सासऱ्याचा खून; उल्हासनगर येथील घटना

लाकडी दांडक्याने मारहाण करत जावयाने केला सासऱ्याचा खून; उल्हासनगर येथील घटना

Newsworldmarathi Mumbai: पत्नी व मुलांना माझ्यासोबत पाठवा, असा हट्ट धरत असलेल्या जावयाला सासऱ्याचा नकार सहन न झाल्याने त्याने चक्क सासऱ्याचा लाकडी दांडक्याने मारहाण करून जागीच खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर येथे घडली असून आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांनी हत्या व अन्य गंभीर आरोपांत गुन्हा दाखल केला आहे.

सुशीलसिंह गौंड सरदार (वय ५२) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बोलासिंह जगदीशसिंह भवर (वय-३५) असं आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलासिंह जगदीशसिंह भवर हा जळगावचा रहिवासी आहे. तो बुधवारी उल्हासनगरमध्ये आपल्या सासऱ्याच्या घरी आला होता. त्याची पत्नी व मुले सासरी राहत होती आणि जावयाने त्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कौटुंबिक वादामुळे सरदार यांनी आपल्या मुलीसोबत नातवंडांना देण्यास स्पष्ट नकार दिला

यामुळे संतप्त झालेल्या भवरने सासऱ्याशी जोरदार वाद घातला. रागाच्या भरात लाकडी दांडका उचलून सरदार यांच्यावर हल्ला केला. या अमानुष मारहाणीत सरदार यांचा जागीच मृत्यू झाला. इतक्यावरच न थांबता, त्यांच्या पत्नीने मध्ये पडून बचाव करण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावरही भवरने हात उगारला आणि त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments