Newsworldmarathi Beed : दारू पिण्यासाठी वृद्ध आईने पैसे दिले नाही म्हणून पोटच्या मुलाने तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा गावात घडली आहे. चोत्राबाई भानुदास सोन्नर (वय-७२) असं मृत वृद्धेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा, सून, नातवंडासह चोत्राबाई गावात राहत होती. त्यांचा मुलगा अमृत यास दारूचे व्यसन असून तो नेहमी दारू पिल्यानंतर गोंधळ घालत व शिवीगाळ करत होता. या त्रासाला घरातील सर्व कुटुंबीय वैतागले होते. नेहमीप्रमाणे त्याने गुरुवारी रात्री दारूसाठी आईला पैसे मागितले. आईने पैसे नसल्याने असमर्थता दर्शविली.
याचा राग मनात ठेवून त्याने मध्यरात्री आई झोपलेली असताना तिच्या डोक्यात दगड घातला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. या घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.


Recent Comments