HomeपुणेJayant Patil on Ajit Pawar : मुख्यमंत्रीपद पाच वर्षे शक्य नाही, पण...

Jayant Patil on Ajit Pawar : मुख्यमंत्रीपद पाच वर्षे शक्य नाही, पण झाले तर आनंदच; जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

Newsworldmarathi Pune : Jayant Patil on Ajit Pawar : ‘ज्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण मुख्यमंत्री होणं पाच वर्षे शक्य नाही. तरीही जर ते मुख्यमंत्री झालेच, तर आम्हाला आनंदच आहे’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या खास शैलीत टोला लगावला.

२ मे रोजी एका कार्यक्रमात अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती त्यावर जयंत पाटील यांनी अजित पवार याना जोरदार टोला लगावला. सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये अजित पवार यांच्यासाठी मुख्यमंत्री पद मिळणं शक्य नाही, पण अशा संधी आल्यास त्यात विरोध नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या इच्छेला नर्म विनोदी टोला लगावला.

दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का?

गेल्या काही दिवसांत शरद पवार व अजित पवार एकाच मंचावर अनेकदा दिसल्याने, दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, या चर्चांना उधाण आले होते. यावर जयंत पाटील म्हणाले की, ‘रयत शिक्षण संस्थेची एक बैठक होती. त्याला राजकीय अर्थ लावण्यात काहीही अर्थ नाही. घरात एखादा कार्यक्रम झाला असेल, तर तो घरगुती असतो. अशा भेटीगाठींना राजकीय अर्थ देऊ नये, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट सांगितले.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, निधी कपात केल्यामुळे या दोन्ही खात्यांवर अन्याय होईल, असे वाटत आहे. सरकारमधून बाहेर पडताना या सर्वांनी अजित पवार यांच्या नावाने तक्रार केली आणि नवीन सरकार स्थापन केले. आता तक्रार करायला शिरसाट यांच्याकडे काही उरले नाही. ते अर्थ खात्यावर बोलत असतील तर, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत दखल घेतली पाहिजे. सरकारमध्ये दोनवरून तीन पक्ष झाले, लाडकी बहीण योजनेसाठी निधी दिला, आता त्यांना वाटेल ते करतील. कारण लोकांनी त्यांना निवडून दिले आहे, असं म्हणत पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाना साधला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments