Newsworldmarathi pune : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) उद्या (5 मे) बारावीचा (Hsc) निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 5 मे सोमवारी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मागील कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांना या निकालाची प्रतिक्षा होती. अखेर उद्या निकालाची प्रतिक्षा संपणार आहे.
या संदर्भात नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात निकालासंदर्भात आणि गुणपडताळणीच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार दिनांक ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
या अधिकृत वेबसाइट्सवर पहा निकाल
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
असा करा निकाल चेक?
सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा.
होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता.


Recent Comments