Newsworldmarathi Pune: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेचा निकाल सोमवार, ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सविस्तर निकाल पाहता येईल. तसेच निकालाच्या माहितीची प्रत (प्रिंटआऊट) घेता येणार आहे.
राज्यात बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली. यंदाच्या परीक्षेला सर्व नऊ विभागीय मंडळांमार्फत १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याकरिता ६ ते २० मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ७ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल १७ दिवस अगोदर निकाल जाहीर होत आहे. मागील वेळी २२ मे रोजी निकाल जाहीर झाला. यंदा लेखी परीक्षा १० दिवस अगोदर सुरू झाली. त्यामुळे निकालदेखील लवकर जाहीर होणार असल्याचे शिक्षणमंत्री, राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले होते.
ऑनलाईन निकाल पाहण्याठी अधिकृत संकेतस्थळ
१. https://results.digilocker.gov.in
२. https://mahahsscboard.in
3. http://hscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com


Recent Comments