Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अखेर बारावीचा निकाल आज (५ मे २०२५) जाहीर केला. सकाळी अकरा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत मंडळाकडून निकालाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यंदाचा राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला असून, तो मागील वर्षांच्या तुलनेत समाधानकारक मानला जात आहे.
नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, तब्बल ९६.७४ टक्के निकालासह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. दुसरीकडे, लातूर विभागाने सर्वात कमी ८९.४६ टक्के निकाल नोंदवत राज्यात तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले.
राज्यभरातील विद्यार्थी व पालकांनी हा निकाल मोठ्या उत्सुकतेने आणि प्रतीक्षेनंतर पाहिला. यंदा लेखी परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दहा दिवस लवकर पार पडली होती, त्यामुळे निकालही अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर करण्यात आला. विद्यार्थी आता पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया आणि करिअर नियोजनाकडे वळणार आहेत.


Recent Comments