Homeपुणेरिपब्लिकन पक्ष (आठवले) ची पुणे शहर कार्यकारणी बरखास्त

रिपब्लिकन पक्ष (आठवले) ची पुणे शहर कार्यकारणी बरखास्त

Newsworldmarathi Pune: रिपब्लिकन पक्ष (आठवले) ची पुणे शहरातील विशेष कमिटीची बैठक शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. सदरच्या बैठकीमध्ये पुणे शहर कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच फेरनिवड करण्यात येणार आहे.

आगामी महानगरपालिका निवडणूक डोळयासमोर ठेवून संघटनात्मक बांधणी करण्याकरीता एकमताने निर्णय घेण्यात आला असून  येत्या पंधरा दिवसात नवीन कार्यकारणीची निवड करण्यात येणार आहे, असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. 

या बैठकीस परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड, शाम सदाफुले, रफिक दफेदार, महेंद्र कांबळे, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, हिमाली कांबळे, महादेव दंदी, बाळासाहेब जगताप, विरेन साठे, संदिप धांडोरे आदि उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments