Homeपुणेसद्यस्थिती पाहता रक्तदान ही एक व्यापक चळवळ व्हायला हवी : राजेश शहा.

सद्यस्थिती पाहता रक्तदान ही एक व्यापक चळवळ व्हायला हवी : राजेश शहा.

Newsworldmarathi Pune : धी पूना गुजराती केळवणी मंडळ, श्री पूना गुजराती बंधू समाज आणि महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील प्रतिष्ठित हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात रक्तदान आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष राजेश शहा व पूना हॉस्पिटल मॅनेजमेंटचे ट्रस्टी श्री. सुजयभाई शहा यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन राजेश शहा यांनी ‘सद्याची युद्धमय परिस्थिती पाहता आतापासूनच देशभरातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलनाची व्यापक मोहीम हाती घेणे गरजेचे ठरते.’ असे मत व्यक्त केले. तसेच, एच व्ही देसाई डोळ्यांचे हॉस्पिटल द्वारे आजपर्यंत हजारो नागरिकांच्या डोळ्यांवर मोतीबिंदू, काचबिंदू या शस्त्रक्रिया मोफत केल्या गेल्या असून हे कार्य अव्याहतपणे चालूच राहील अशी ग्वाही राजेश शहा यांनी दिली.

समाजातर्फे वर्षभर सुरू असलेल्या रक्तदान शिबिरांद्वारे जवळपास १००० रक्तदात्यांचे रक्त संकलन केले गेले. यामध्ये पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या राकेश जैन रक्तपेढीने आपली भूमिका बजावली. तर देसाई हॉस्पिटलच्या माध्यमातून आज नागरिकांचे डोळे तपासून त्यांना चष्म्यांचेही मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत अनेकांचा हातभार लाभला. नैनेश नंदू, राजेंद्र शहा, हर्रैश शहा हेमंत मणियार, विनोद देडिया, संदीप शहा, हेमंत मेहता, संजय मेहता, केतन कापडिया, दिपक महैता पंकज देडिया आणि श्रीमती कृती नागरेचा यांनी या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अविरत श्रम घेतले.

या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. ऋषी दुबे, महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचे विकास मुळीक, विद्यार्थी तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. संदीप देशपांडे यांनी विशेष मेहनत घेतली. महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी स्वतःही रक्तदान करून इतरांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

रक्तदान शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या रक्तदान शिबिराची सुरुवात डॉ. ऋषी दुबे आणि श्री. संदीप देशपांडे यांच्या रक्तदानाने झाली. या शिबिरात एकूण ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर सुमारे २५४ एवढ्या नागरिकांनी डोळे तपासून जवळपास १०० जणांनी चष्माही मिळविला. तसेच अनेक गरजूंनी आपल्या डोळ्यावरील अत्यावश्यक व खर्चिक असणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत करून मिळण्याचा मार्ग मोकळा करून घेतला.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments