Newsworldmarathi Pune: लोकसभा निवडणूक खासदार , विधानसभे मध्ये ६ आमदार निवडून देत पुण्यात भारतीय जनता पक्षाचे ५.५०लक्ष सदस्य नोंदणी करत भारतीय जनता पक्षाने येणाऱ्या महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचाच महापौर असेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केला.
आज भारतीय जनता पार्टी च्या ५८ जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली या मध्ये घाटे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली.
यावर बोलताना घाटे पुढे म्हणाले की,’ पक्षाने परत संधी देऊन जो विश्वास दाखवला तो सार्थ करून पक्षाची ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे या निवडी बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यध्यक्ष रवींद्र चव्हाण , केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांचे आभार घाटे यांनी मानले.
Recent Comments