Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित गट) पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मंगळवारी (१३ मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सादर केला असून, आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
दीपक मानकर यांच्यासह रौनक जैन आणि शंतनू कुकडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या तपासानुसार, रेड हाऊस फाउंडेशनच्या बँक खात्यातून १.१८ कोटी रुपये दीपक मानकर यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचा पुरावा सापडला आहे. तसेच त्यांनी सादर केलेले जमिनीच्या विक्रीचे दस्तऐवज बनावट असल्याचे उघड झाले आहे.
शंतनू कुकडे, हे पक्षाचे माजी पदाधिकारी आहेत, ते सध्या बलात्कार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत.
दीपक मानकर यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, “महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे. पक्षावर अनावश्यक बदनामी येत असून, म्हणून मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे.” दरम्यान, पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी हा राजीनामा अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी अडचण ठरू शकतो.
Recent Comments