Homeपुणेखळबळजनक...! मुख्याध्यापक पत्नीने पतीला संपवलं; विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेह जंगलात नेऊन जाळला

खळबळजनक…! मुख्याध्यापक पत्नीने पतीला संपवलं; विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेह जंगलात नेऊन जाळला

Newsworldmarathi Yavatmal : शहरातून एक धक्क्कादायक बातमी समोर आली आहे. १५ मे रोजी यवतमाळमधील चौसाळा जंगलात एक मृतदेह आढळला होता, त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, मृतदेहामागील गूढ उकलण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे. मुख्याध्यापक पत्नीनेच पतीला विष देऊन खून केला. तसेच, विद्यार्थ्यांच्या मदतीने पहाटेच्या सुमारास जंगल परिसरात मृतदेह जाळल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात झाला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनू अरविंद देशमुख ( वय-३२, रा. सुयोगनगर) यांचा मृतदेह असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. शंतनू १३ मे च्या सायंकाळपासून बेपत्ता होते. ते सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर त्याच ठिकाणी त्यांची पत्नी निधी (वय- २३) ही मुख्याध्यापिका होती. त्या दोघांचा प्रेमविवाह असल्याने तो आई-वडिलांपासून विभक्त राहत होता.

दरम्यान, जंगलामध्ये मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच शंतनूसोबत बारमध्ये असणाऱ्या मित्रांमध्ये कुजबुज सुरू झाली. पोलिसांनी त्यांच्या मित्रांची चौकशी सुरू केली. त्यावेळी एका मित्राच्या मोबाइलमध्ये शंतनूचा १३ मे रोजीचा फोटो दिसला. त्याच्या अंगातील सदरा आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा हे दोन्ही सारखेच निदर्शनास आले होते. येथूनच पोलिस तपासाची दिशा निश्चित झाली.

मुख्य आरोपी पत्नी निधीने पोलिसांना गुंगारा दिला. मात्र, तिच्या घरात आढळलेली अंडरवेअर व मृतदेहाच्या अंगातील अंडरवेअर एकाच कंपनीची होती. त्यामुळे पोलिसांचा संशय आधिक बळावला गेला. निधीची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. निधीला मृतदेह जाळण्यास मदत करणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments