Homeपुणेपुणे माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिवाजीराव खांडेकर

पुणे माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिवाजीराव खांडेकर

Newsworldmarathi pune: पुणे विभाग माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांची तर व्हाईस चेअरमन पदी कोळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड या सहा जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सभासद आहेत. पुणे विभाग माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अडीअडचणी सोडविण्याबरोबरच सर्व संचालक व सभासद यांना विश्वासात घेऊन पतसंस्थेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नूतन चेअरमन शिवाजीराव खांडेकर यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले. शिवाजीराव खांडेकर यांचे शिक्षकेतर महामंडळाचे राज्य अध्यक्ष अनिल माने, जिल्हाध्यक्ष रमेश इंगवले, जिल्हा सचिव इम्रान मुल्ला, राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, अमीर मुलाणी, सचिव श्रीशैल चव्हाण यांच्या सह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments