Newsworldmarathi Gujrat: Dr. Pratik Joshi Family Death | अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एक हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे, ज्याने सर्वांचे मन हेलावून टाकले. राजस्थानच्या बांसवाडा येथील डॉ. प्रतीक जोशी, त्यांच्या पत्नी डॉ. कोनी व्यास आणि तीन मुलं प्रद्युत, मिराया आणि नकुल लंडनला नव्या आयुष्याच्या स्वप्नांसह निघाले होते. पण नियतीने त्यांचे सर्व स्वप्न अवघ्या दोन मिनिटांत उद्ध्वस्त केले.
डॉ. प्रतीक २०१६ पासून लंडनमध्ये स्थायिक होते, तर डॉ. कोनी उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी कोनी यांनी नुकताच नोकरीचा राजीनामा दिला होता.
दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर व्हिसा मिळाल्याचा आनंद साजरा करत, गुरुवारी (१२ जून) ते एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 मधून लंडनला निघाले. विमानात बसताच त्यांनी उत्साहाने काढलेला सेल्फी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा फोटो ठरला, ज्यामध्ये नव्या सुरुवातीचा आनंद झळकत होता.
मात्र, टेकऑफनंतर काही क्षणांतच विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळले. प्रचंड आगीच्या ज्वाळांमध्ये २४२ प्रवाशांपैकी २४० जणांचा मृत्यू झाला, यात डॉ. प्रतीक, डॉ. कोनी आणि त्यांच्या तीन निष्पाप मुलांचाही समावेश होता.
केवळ एक प्रवासी वाचला. हा सेल्फी आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, बांसवाडा आणि उदयपूरमधील त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वत्र शोककळा पसरली आहे. ही घटना घडल्याचे कोणालाही विश्वास बसत नाही, आणि हे कुटुंब आता फक्त स्मृतींमध्ये उरले आहे.


Recent Comments