Newsworldmarathi Pune: “समाजाच्या गरजा ओळखून योग्य त्या योजना राबवणे, ही माझी कायमची भूमिका आहे. कोथरुडमध्ये अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले जात असून, माजी नगरसेवक दीपक पोटे यांनी याच भूमिकेची पूर्तता केली आहे. त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले पाहिजे,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या माध्यमातून आरोग्य सेवकांना रेनकोट आणि प्रभागातील नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाबाबत दीपक पोटे म्हणाले, “माणुसकीची जाण आणि निस्वार्थ सेवा हेच आमचं ब्रीद आहे. समाजातील गरजूंना वेळोवेळी मदत करणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हाच खरा समाजसेवेचा मार्ग आहे. ही गरज ओळखून आम्ही नेहमीच विविध उपक्रम राबवत असतो. यंदा माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवक आणि नागरिकांसाठी रेनकोट व छत्री वाटप करण्यात आले. पावसात सेवा बजावणाऱ्या हातांना दिलासा देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.”
या कार्यक्रमावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, प्रतीक देसरडा, माजी नगरसेवक जयंत भावे, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, अॅड. मिताली सावळेकर, प्रशांत हरसुळे, गिरीश खत्री, अमोल डांगे, दीपक पवार, अॅड. प्राची बगाटे, मंदार बलकवडे, अनुराधा एडके, आशिष काटे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व आरोग्य सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments