Homeपुणेमहिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन; भाजप नेते प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन; भाजप नेते प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

Newsworldmarathi Pune: काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याला त्रास दिल्याप्रकरणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच, आता भाजपच्या एका आमदाराच्या समर्थकाने थेट महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या या घटनेत, भाजप नेते प्रमोद कोंढरे यांनी ड्युटीवर असलेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याशी अनुचित वर्तन केले, असा आरोप आहे. संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्यात हे वर्तन स्पष्टपणे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फरासखाना पोलीस ठाण्यात प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कोंढरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

या घटनेनंतर राजकीय व प्रशासकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजसह अन्य पुरावे तपासात घेतले जात आहेत.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments