Homeपुणेदक्षिणद्वारी भगवा ध्वज उभारणीस आयुक्त सकारात्मक; 'राष्ट्रवादी' गड किल्ले संवर्धन सेलचा प्रस्ताव

दक्षिणद्वारी भगवा ध्वज उभारणीस आयुक्त सकारात्मक; ‘राष्ट्रवादी’ गड किल्ले संवर्धन सेलचा प्रस्ताव

Newsworldmarathi Pune: शिवकालीन ऐतिहासिक पुणे शहराच्या दक्षिण द्वारी कात्रज घाटाच्या जुना कात्रज बोगदा परिसरात उत्तुंग भगवा ध्वज उभा करावा या ‘राष्ट्रवादी’ गडकिल्ले संवर्धन सेल च्या मागणीला पुणे महापालिकेचे आयुक्त सकारात्मकता दर्शवली आहे.

राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांनी वसवलेलं तसेच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाने पावन झालेल्या पुणे शहराच्या दक्षिण द्वारी उत्तुंग ‘भगवा ध्वज’ उभारण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल चे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना दिले. नवनियुक्त आयुक्त म्हणून नवलकिशोर राम यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांचे स्वागत व सन्मान करण्याच्या निमित्ताने संवाद साधण्यात आला. राष्ट्रवादी गडकिल्ले संवर्धन सेल तर्फे शाल व छत्रपती संभाजी महाजांची मुर्ती देवून सन्मान करण्यात आला.

शिवकालीन कात्रजच्या घाटाचे महत्व भावी पिढ्यांच्या स्मरणात सदोदित राहावे म्हणून कात्रज जुना बोगदा परिसरात ‘उत्तुंग भगवा ध्वज’ उभा करावा तसेच दक्षिण भारतातून शहरात येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करणारी ‘स्वागत कमान’ उभारावी या आशयाचे निवेदन आयुक्तांना दिले. शेलार यांच्या संकल्पनेचे स्वागत करून आयुक्तांनी भगवा ध्वज उभारण्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्याचवेळी महापालिकेसमोर असलेली असंख्य आव्हानं पेलताना लोकसहभाग वाढवा यासाठी क्षेत्रीय कार्यालयातील ‘मोहल्ला कमीटी’ अधीक सक्षम व्हावी आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून शेलार यांनी मोहल्ला कमीटीच्या बैठकित नागरिकांनी मांडलेले सर्व समस्या त्याच महिन्यात सोडवल्या जाव्यात याबाबतचेही निवेदन दिले.

झपाट्याने वाढलेल्या पुणे शहरातील समस्या सोडवण्यासाठी विभागवार नियोजन करणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले. सेलचे पदाधिकारी मनोजकुमार भोसले,अविनाश जाधव,महेंद्र देवघरे, कुणाल शेलार हे उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments