Homeपुणेशालेय जीवनापासून स्पोर्ट्स कडील कल वाढावा : डॉ राजेश शहा

शालेय जीवनापासून स्पोर्ट्स कडील कल वाढावा : डॉ राजेश शहा

Newsworldmarathi Pune: द पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात युथ, ज्युनिअर व सिनियर गटाच्या जिल्हा पातळीवरील वेट लिफ्टिंग स्पर्धा आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठीच्या जिल्हा संघाची निवड चाचणी दि १४ आणि १५ सप्टेंबर रोजी पार पडली. यावेळी बोलताना अधिकाधिक तरुण तरुणींनी योग्य वेळेत खेळांकडे लक्ष देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या देशाचे नांव उज्ज्वल करावे, यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत संस्था व संस्थेच्या पीजीकेएम स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत पुरविली जाईल असे संस्थेचे चेअरमन डॉ. राजेश शहा यांनी प्रतिपादन केले.

याप्रसंगी बोलताना डॉ शहा यांनी शालेय जीवनापासूनच पालक व शिक्षक यांनी स्पोर्ट्स बाबत मुला-मुलींना जागरूक करावे आणि खेळाकडील त्यांचा कल वाढवण्यास मदत करावी असे नमूद केले.

याप्रसंगी यशस्वी झालेल्या खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्रे देण्यात आले. त्यावेळी देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र गुरव, शारीरिक क्रीडा संचालक डॉ ऋषी दुबे, वाणिज्य विभाग अधिष्ठाता यशोधन मिठारे आणि प्रशासकीय अधिकारी संदीप देशपांडे तसेच पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर तर उपाध्यक्ष शरद काळे उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments