Homeपुणेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू एंजल स्कूलतर्फे वृक्षारोपण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू एंजल स्कूलतर्फे वृक्षारोपण

Newsworldmarathi Pune: आपल्या देशाचे लोकप्रिय व दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू एंजल स्कूलच्या वतीने पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. या निमित्ताने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास मा. नगरसेविका व पुणे शहर भाजप चिटणीस रूपाली दिनेश धाडवे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते तसेच शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी एकमुखाने “एक व्यक्ती – एक वृक्ष” हा संकल्प करून समाजातील सर्वांनी वृक्षलागवडीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले. पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने या जबाबदारीत आपला वाटा उचलला पाहिजे, हा संदेश विद्यार्थ्यांनी घोषणांमधून दिला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रूपाली धाडवे म्हणाल्या, “आजच्या काळात वृक्ष लागवड ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून जीवन जगण्यासाठी आवश्यक अशी गोष्ट आहे. भावी पिढ्यांसाठी शुद्ध हवा, स्वच्छ पर्यावरण आणि हरित वातावरण ठेवायचे असेल, तर प्रत्येकाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.” विद्यार्थ्यांनी घेतलेल्या संकल्पाचे त्यांनी कौतुक केले आणि अशा उपक्रमांमधूनच समाजात पर्यावरणाबद्दल जनजागृती होत असल्याचे सांगितले.

या सोहळ्यास शाळेचे सर्व शिक्षक, पदाधिकारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments