Homeपुणे३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार भव्य उद्घाटन

३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार भव्य उद्घाटन

Newaworldmarathi Pune: कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि धार्मिक भक्तीभावाचा संगम असणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे यंदाचे ३१वे वर्ष दिमाखात साजरे होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.

उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, राज्याच्या नागरी विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. मेधा कुलकर्णी, आमदार डॉ. विश्वजित कदम, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण
या सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, शितल अहिरराव, राधा सागर, सिया पाटील, ऋजुता जुन्नरकर, अमृता धोंगडे व वैष्णवी पाटील विशेष उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाचे सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे रसिकांसाठी विनामूल्य असतील, अशी माहिती आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरवर्षीप्रमाणे घटस्थापना सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६.४१ वाजता शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात मा. उपमहापौर, अध्यक्ष आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते होईल. यंदा मंदिर परिसरात दक्षिण भारतातील माधुराई येथील ७२ फुट उंचीचे मीनाक्षी मंदिर साकारले जात असून सुमारे ८० कलावंतांनी हा देखावा उभारला आहे.

पुरस्कार वितरण
उद्घाटन सोहळ्यात समाजकार्यात व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. यंदा ‘महर्षी पुरस्कार’ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर ‘श्री लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्कार’ प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, समाजकार्यकर्त्या डॉ. मेघा पुरव सामंत, बुलढाणा सहकारी बँकेचे सहसंस्थापक शिरीष देशपांडे आणि लोककलावंत प्रमिला लोदगेकर यांना देण्यात येईल. तसेच डॉ. मयूर कर्डिले व डॉ. अरविंद खोमणे यांचाही विशेष सत्कार होणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
उद्घाटन सोहळ्यात सितार, व्हायोलिन, बासरी आणि तबल्याची जुगलबंदी असलेला ‘आनंद तरंग’ हा कार्यक्रम डॉ. नीलिमा राडकर व माधवी करंदीकर यांच्या ग्रुपकडून सादर केला जाईल. नृत्यगुरु पं. शमा भाटे ‘शरण्ये रुद्र चंडिके’ हा कथ्थक कार्यक्रम सादर करतील. विनोद व स्वाती धोकटे यांचा ‘जागर शक्ती पिठांचा’ देवीचा गोंधळ आणि मराठी सिनेतारकांचा ‘जल्लोष’ हा नृत्याविष्कार रसिकांना मंत्रमुग्ध करेल.

सलग ११ दिवस संगीतमय सोहळा
उद्घाटनानंतर महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम सलग ११ दिवस विजयादशमीपर्यंत दररोज सायं. ७ वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहेत.

२३ सप्टेंबर : ‘नाईनटीज मेलडी’ – अभिजित सराफ, कल्याणी देशपांडे, अक्षय घाणेकर.
२४ सप्टेंबर : ‘इश्क सुफियाना’ – संदीप पंचवाटकर, प्रवीण अवचर, संदीप उबाळे, विनल देशमुख.
२५ सप्टेंबर : ‘स्वर साम्राज्ञीयाँ’ – राधिका अत्रे, राजेश्वरी पवार, कविता सेंगर, चारुलता पाटणकर.
२६ सप्टेंबर : ‘म्युझिकल मास्टर्स – एल.पी. & आर.डी.’ – पल्लवी पत्की ढोले, संजय हिवराळे, रफी हबीब आदी कलाकार.
२७ सप्टेंबर : ‘अस्मिता महाराष्ट्राची’ – पृथ्वीराज नागवडे, अंकिता शिवतरे, सौगंध कापसे व ५० कलाकारांची साथ.
२८ सप्टेंबर : महिलांसाठी खास आकर्षण ठरलेला भव्य ‘लावणी महोत्सव’ सलग १२ तास चालणार आहे.
२९ सप्टेंबर : ‘टोटल म्युझिक धमाका’ – मुकेश देढीया, तेजस्विनी पाहुजा, चंद्रशेखर महामुनी, माधुरी भोसेकर व आकाश सोलंकी.
३० सप्टेंबर : ‘बेमिसाल रफी’ – आली हुसेन, आनंद म्हसवडे, कल्याणी देशपांडे.
१ ऑक्टोबर : ‘हृदयात वाजे समथिंग’ – तन्वी दात्ये, ए सराफ, अवंतिका धुमणे, आर.जे. बंड्या.
२ ऑक्टोबर : सांगता कार्यक्रम ‘सोलफुल किशोर कुमार’ – जितेंद्र भूरूक, रुपाली घोगरे व ग्रुप.

या सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, उपाध्यक्ष घनशाम सावंत, सचिव नंदकुमार कोंढाळकर, सदस्य रमेश भंडारी, अमित बागुल आणि हेमंत बागुल या सर्वांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments