Newsworldmarathi Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या विद्यापीठस्तरीय आंतर-महाविद्यालयीन ‘जल्लोष २०२५’ युवक महोस्तव स्पर्धेत यजमान नौरोसजी वाडिया महाविद्यालयाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकाविण्याचा बहुमान मिळविला. पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते महाविद्यालयाने विजेत्यापदाचा करंडक स्वीकारला.
पुणे विभागीय या स्पर्धेत पुणे शहर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यातील पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील १२०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी संगीत, नाट्य, नृत्य, साहित्य आणि ललित कला अशा पाच प्रमुख गटामधून २७ कला प्रकारामध्ये सहभाग घेतला होता. वाडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी एकूण ८८ गुणांसह विजेतेपद पटकवले तर उपविजेत्या मॉडर्न लॉं कॉलेजला ३९ गुण मिळाले.
या स्पर्धेत महाविद्यालयाने भारतीय सुगम गायन, ताल-वाद्य वादन, लोकवाद्यवृंद, लोकनृत्य, प्रहसन, व मुकनाट्य या प्रकारात प्रथम, पाश्चिमात्य वैयक्तिक गायन, एकांकिका, नकला, वादविवाद या प्रकारामध्ये द्वितीय, तर पाश्चिमात्य वाद्य वादन मेहंदी व कोलाज मध्ये तृतीय असे एकूण १४ कला प्रकारामध्ये क्रमांक पटकाविले.
सदर कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य,अधिसभा सदस्य, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक तसेच मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. सचिन सानप, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत चाबुकस्वार, सांस्कृतिक समन्वयक प्रा. डॉ. हनुमंत लोखंडे, विद्यार्थी विकास कल्याण अधिकारी डॉ. महेश पांढरपट्टे व सर्व शिक्षक-शिक्षेकतर कर्मचारी मोठ्या संख्येने होते


Recent Comments