Homeपुणेपुणे पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीने गाजला अशोक तरुण मंडळाचा महिला महाआरतीचा सोहळा

पुणे पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीने गाजला अशोक तरुण मंडळाचा महिला महाआरतीचा सोहळा

Newsworldmarathi Pune: अशोक तरुण मंडळ आणि अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ आयोजित नवरात्रोत्सव यंदा भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकात्मतेचा संगम ठरला. मा नगरसेविका अर्चना पाटील आणि उपाध्यक्ष तुषार पाटील व मंडळातर्फे साकारण्यात आलेल्या “मार्तंड भैरव खंडोबाचा मंगल विवाह सोहळा” यांसारख्या भव्य जिवंत देखाव्यांनी भाविकांची मने जिंकली.

उत्सवाचा सर्वोच्च क्षण ठरला तो म्हणजे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेला भव्य महिला महाआरतीचा सोहळा. हजारो महिलांच्या उपस्थितीत झालेल्या या महाआरतीने देवीच्या जयघोषाने आणि मंगल आरतीच्या स्वरांनी परिसर दुमदुमून गेला.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी देवीची महाआरती केली. कत्यानंतर त्यांनी महिला भगिनींशी आणि नागरिकांशी संवाद साधत “समाजात एकजूट आणि सहकार्य हीच खरी ताकद आहे” असा संदेश दिला. पोलिस आयुक्तांचा सत्कार नगरसेविका अर्चना पाटील आणि उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केला.

या सोहळ्याला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अभूतपूर्व होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या नियोजन आणि शिस्तबद्धतेमुळे कार्यक्रमाची शान अधिकच वाढली. अशोक तरुण मंडळ आणि अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या यशस्वी आयोजनामुळे हा नवरात्रोत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे तर सामाजिक ऐक्य व समुदायभावनेचा एक प्रेरणादायी सोहळा ठरला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments