Newsworldmarathi Pune: शारदीय नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वात पर्वती मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २१ मधील प्रेमनगर आणि आंबेडकर नगर परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. परिसरातील विविध मंडळांनी भव्य सजावट, देवीची आरास आणि धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय केले होते.
या पार्श्वभूमीवर मा. सभागृह नेते, पुणे लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमले यांनी विशेष भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. त्यांनी जय भवानी मित्र मंडळ, महिला मंडळ येडेश्वरी, महालक्ष्मी महिला मंडळ, विजय तरुण मंडळ, अखिल मातोश्री मित्र मंडळ, तुळजा भवानी महिला मंडळ, युवक क्रांती मंडळ, प्रेमनगर तरुण मंडळ, जय तुळजा भवानी महिला मंडळ, श्री ओम मित्र मंडळ, बालाजी मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, जागृती मित्र मंडळ आणि महर्षीनगर युवक संघटना अशा अनेक मंडळींना भेट दिली.

भेटीदरम्यान श्रीनाथ भिमले यांनी कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधून नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे, तर सामाजिक एकतेचा आणि सामुदायिक सहभागाचा द्योतक असल्याचे सांगितले. परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करत आपुलकी व्यक्त केली.
या सोहळ्यातून समाजात एकात्मता, बांधिलकी आणि प्रगतीचा संदेश दृढ व्हावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली. प्रेमनगर आणि आंबेडकर नगर परिसरातील भक्तिमय वातावरणात झालेल्या या भेटीमुळे नागरिक व कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.


Recent Comments