Newsworldmarathi Pune: “वाढदिवस हा केवळ आनंदाचा क्षण न राहता, समाजासाठी काहीतरी देण्याचा संकल्पदिवस ठरावा,” असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. पुण्यात रक्ताचा तुटवडा भासत असताना, वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरासारखे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी सरपंच व्यंकोजी खोपडे यांच्या पुढाकाराने, गोरक्षस्मृती फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. ३८ यांच्या वतीने कात्रज चौक भाजी मंडई येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिक, कार्यकर्ते आणि स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवली.
या प्रसंगी बोलताना व्यंकोजी खोपडे म्हणाले, मुरलीधर मोहोळ यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवून जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. रक्तदान शिबिर हा या बांधिलकीचा एक छोटासा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, अरुण राजवाडे, संदीप बेलदरे, राणी भोसले, डॉ. सुचेता भालेराव, अभिजित कदम, महेश कदम,विकास फाटे, दिगंबर डवरी, संतोष ताठे, गणेश निंबाळकर, आबासाहेब मांगडे, सुनील मांगडे, गणेश काळे, विक्रम भिलारे, निलेश धनावडे, महेश धूत आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदानानंतर सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या वेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, “रक्तदान ही सर्वश्रेष्ठ मानवसेवा आहे. एका थेंब रक्ताने एखाद्याचे प्राण वाचू शकतात. व्यंकोजी खोपडे यांनी वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा हा उपक्रम राबवून एक आदर्श घालून दिला आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या सामाजिक उपक्रमामुळे कात्रज परिसरात “वाढदिवस म्हणजे समाजसेवेचा उत्सव” हा संदेश पोहोचला असून नागरिकांत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.


Recent Comments