Homeपुणेआमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात...

आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात दत्तगुरूंची आरती

Newsworldmarathi Pune: उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर येथे दर्शन घेऊन दत्तगुरूंची विधिवत आरती केली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यात त्यांनी दत्तगुरूंचे दर्शन घेत राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

Advertisements

यावेळी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने चंद्रकांतदादा पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. मंदिर परिसरात उपस्थित भाविकांनीही या प्रसंगी उत्स्फूर्त प्रतिसाद देत धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Advertisements

या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन, कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे व वर्षा थोरवे, खजिनदार ॲड. सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषा खेडेकर, विश्वस्त डॉ. पराग काळकर तसेच महेंद्रशेठ गाडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

धार्मिक परंपरा जपत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सातत्याने पुढाकार घेणाऱ्या दत्त मंदिर ट्रस्टतर्फे विविध मान्यवरांना मंदिरात आमंत्रित करून दर्शन व आरतीचे आयोजन केले जाते. त्याच परंपरेचा भाग म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमानंतर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिराच्या विविध उपक्रमांची माहिती देत भविष्यातील धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांबाबतही चर्चा केली. उपस्थित भाविकांनी दत्तगुरूंच्या जयघोषात आरतीचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments