सर्वांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा राज्य निवडणूक आयोग आज (सोमवार) संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषदेत जाहीर करण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह १५ महापालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक अपेक्षित आहे.
राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्यानिवडणुकांच्या तारखा आज (१५ डिसेंबर) जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग आज संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची असून यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक घोषित केले जाईल, असे बोलले जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ही पत्रकार परिषद मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत आयोगाकडून महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा आणि संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या निवडणुकांना मिनी विधानसभा म्हणूनही ओळखले जाते. या निवडणुकीमुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कारभाराची दिशा ठरणार आहे. या बहुप्रतिक्षित निवडणूक कार्यक्रमात प्रामुख्याने खालील १५ मोठ्या महापालिकांचा समावेश असेल, अशी माहिती समोर येत आहे.


Recent Comments