Maharashtra Election Commission Press Conference: राज्य निवडणूक आयोगाची आज (दि. १५ डिसेंबर) बहूप्रतिक्षित पत्रकार परिषद सह्याद्री अतिथी गृह इथं झाली. अनेक वर्षांपासून महानगरपालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा अखेर जीव भांड्यात पडला आहे. राज्यात २९ महापालिका निवडणुका या १५ – १ – २०२६ तारखेला होणार असून या निवडणुकांचे निकाल हे १६ – १ – २०२६ दिवशी लागणार आहे.
राज्यातील २८६९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. १४४२ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. आजपासून २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी आचार संहिता लागू करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली. राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालने २७ नगर पालिकांची मुदत संपली होती. जालना अन् या दोन नवीन नगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत. २८ बहूसदस्यीय तर बृह्नमुंबई महापालिका ही एक सदस्यीय निवडणूक असणार आहे.
संपली होती. जालना अन् या दोन नवीन नगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत. २८ बहूसदस्यीय तर बृह्नमुंबई महापालिका ही एक सदस्यीय निवडणूक असणार आहे.
राज्यात नुकतेच नगर परिषद आणि नगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. मात्र आरक्षण मर्यादा आलोंडल्यामुळं काही नगरपालिका अन् नगर परिषदांचे मतदान ऐत्यावेळी पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर ३ मे रोजी लागणारा निकाल देखील २२ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात यावा असा निर्णय उच्च न्यायालयानं दिला होता.
नगरपरिषद नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतरच महानगर पालिका निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. त्यातच राज्य निवडणूक आयोग १५ डिसेंबरला पत्रकार परिषद घेणार अशी चर्चा होती. त्या प्रमाणे आज १५ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली.
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुका…
उमेदवारी अर्ज भरणे ——२३ डिसेंबर
अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस ——३० डिसेंबर
उमेदवारी अर्जाची छाननी —–३१ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याचे मुदत —–२ जानेवारी
चिन्ह वाटप ——३ जानेवारी
मतदान –१५ जानेवारी
मतमोजणी —–१६ जानेवारी


Recent Comments