Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ४० च्या सर्वांगीण विकासासाठी स्वातीसाई चिटणीस सज्ज झाल्या असून, विकासाचा ठोस अजेंडा घेऊन त्या मैदानात उतरल्या आहेत. नागरिकांच्या मूलभूत गरजा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि इतर नागरी सुविधांवर भर देण्याचा त्यांचा निर्धार आहे. प्रभागातील समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी नियोजित आणि परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले आहे. जनतेशी थेट संवाद साधत विकासाचा दृष्टिकोन पोहोचवण्यावर स्वातीसाई चिटणीस यांचा भर असून, प्रभाग ४० मध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
स्वाती चिटणीस यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची दिशा, कार्यपद्धती आणि पुढील नियोजन यासंदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी कार्यक्षम आमदार चेतनदादा तुपे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत निवडणूक प्रचाराची नियोजित सुरुवात कशी करावी, तसेच जनतेपर्यंत विकासाचा दृष्टिकोन प्रभावीपणे कसा पोहोचवावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
भेटीदरम्यान प्रचाराचे टप्प्याटप्प्याने नियोजन, जनतेशी थेट संवाद साधण्याच्या पद्धती, तसेच स्थानिक प्रश्न आणि विकासकामे यांचा योग्य समतोल साधण्यावर भर देण्यात आला. नागरिकांचा विश्वास संपादन करत सकारात्मक वातावरणात प्रचार राबविण्यासाठी कोणती रणनीती उपयुक्त ठरेल, याबाबतही आमदार चेतनदादा तुपे यांनी मार्गदर्शन केले. तसेच आमदार चेतनदादा तुपे यांनी स्वाती चिटणीस यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आमदार चेतनदादा तुपे यांचे मार्गदर्शन हे केवळ शुभेच्छांपुरते मर्यादित नसून, पुढील वाटचालीसाठी दिशा देणारे आहे. त्यांनी मांडलेले विचार, नियोजनाची स्पष्ट दृष्टी आणि जनतेशी प्रभावी संवाद साधण्याचे मार्ग आगामी प्रचारात निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
– स्वाती चिटणीस


Recent Comments