Newsworldmarathi Pune: महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या दोन दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी युती आघाडीच्या बैठकांनी राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे भाजपने आज जवळपास 22 तगड्या चेहऱ्यांना पक्षांमध्ये आणत विरोधकांवर पहिला डाव टाकला आहे. भाजपने पुणे महापालिका निवडणुकीची संपूर्ण धुरा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे सोपवली आहे. या जोडीच्या रणनीतीमुळे आजचे प्रवेश घडल्याची चर्चा आहे. भाजपचे यंदाच्या निवडणुकीत 125 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार
आज प्रवेश केलेल्यांमध्ये सर्वपक्षीय नेते असून निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीसह ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनी भाजपची वाट धरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सचिन दोडके, माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, अजित पवार गटाच्या सायली रमेश वांजळे, नारायण गलांडे, रोहिणी चिमटे, खंडू सतीश लोंढे, पायल विलास तुपे, प्रतिभा चोरगे, संतोष मते, प्रशांत तुपे, विराज तुपे, इंदिरा तुपे, विकास नाना दांगट, कणव वसंतराव चव्हाण, अमोल देवडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुळशी येथील पदाधिकारी भानुदास पानसरे, गणेश पानसरे, कृष्णकुमार पानसरे, किरण साठे, सचिन पानसरे यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दरम्यान, प्रवेशवेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले “पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात जनसेवेचे उत्तम कार्य केले आहे. भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे. आज तुम्ही या परिवारात सामील झाला आहात. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही,”
केंद्र आणि राज्याचा वेगवान विकास
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकार अत्यंत गतिमान पद्धतीने काम करत आहे. या विकासप्रक्रियेत आता तुमचाही सहभाग असणार आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चंद्रकांत दादा आणि गणेश बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय प्रभावी काम केले आहे. जनतेची सेवा करण्याची तुमची ही पद्धत वाखाणण्याजोगी आहे, असेही यावेळी रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले.


Recent Comments