Newaworldmarathi Pune: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१-ब (महिला राखीव) मुकुंद नगर–सॅलसबरी पार्क या प्रभागातून समृद्धीताई अरकल (शेरला) यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे स्पष्ट ध्येय ठेवून आपण ही निवडणूक लढवत असल्याचे समृद्धी अरकल यांनी सांगितले.
प्रभागातील नागरी समस्या, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर भर देत नियोजनबद्ध विकास साधण्याचा त्यांचा संकल्प आहे. प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याच पार्श्वभूमीवर समृद्धी अरकल यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्ते गणेश शेलार उपस्थित होते. या कार्य अहवालामध्ये त्यांनी आतापर्यंत केलेली सामाजिक कामे, नागरिकांसाठी राबविलेले उपक्रम तसेच भविष्यातील विकास आराखड्याची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. या प्रकाशनप्रसंगी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.
कार्य अहवालाच्या प्रकाशनावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समृद्धी अरकल यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजकार्याची जाण, विकासाची स्पष्ट दृष्टी आणि प्रभागासाठी काम करण्याची तळमळ असल्याने त्या निश्चितच प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Recent Comments