Newsworldmarathi Pune: माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रचारासाठी त्यांची कन्या मृणाल बिडकर या सक्रियपणे मैदानात उतरल्या आहेत. प्रभाग क्रमांक २४ मध्ये त्या नागरिकांशी थेट संवाद साधत असून, वडील गणेश बिडकर यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विविध विकासकामांची माहिती त्या नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत. घराघरांत जाऊन संवाद साधत मृणाल बिडकर नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा आणि प्रश्न जाणून घेत आहेत.

प्रभाग २४ मधील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच मूलभूत नागरी समस्यांबाबत नागरिकांशी सविस्तर चर्चा केली जात आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असून, भविष्यातही प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पक्षाकडून ठोस प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास मृणाल बिडकर यांनी व्यक्त केला.
माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रभाग २४ मध्ये विविध विकासकामे मार्गी लावली. रस्ते सुधारणा, नागरी सुविधा, सार्वजनिक स्वच्छता, तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या कामांचा लेखाजोखा मांडत मृणाल बिडकर नागरिकांशी संवाद साधत आहेत. “वडिलांनी केलेल्या कामांची हीच खरी पावती आहे. नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा आम्हाला पुढील कामांसाठी बळ देणारा आहे,” असे त्या म्हणाल्या.

यावेळी मृणाल बिडकर यांनी नागरिकांना भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. प्रभागातील प्रश्न सोडविण्यासाठी भाजप सक्षम असून, नागरिकांनी साथ दिल्यास प्रभाग २४ चा अधिक वेगाने विकास करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या जनसंवाद मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आपल्या समस्या मांडत अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.


Recent Comments